दैनिक पंचांग रविवार, दि. १७ मार्च २०२४

0
53

दुर्गाष्टमी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, मृग १६|४७
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. देवाण-घेवाण टाळा. प्रवासाचे योग संभवतात.

वृषभ : पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल.

मिथुन : आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. आरोग्य उत्तम राहील. मागील उधारी-उसनवारी वसुल होईल.

कर्क : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

सिंह : आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. कुटुंबाकडून
सहयोग मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

कन्या : आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना करावी लागेल.

तूळ : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. पत्नी व मुलांचा सहवास मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

वृश्चिक : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. मानसिक सुखशांती मिळेल. मन उल्हासित होईल. आर्थिक नुकसानाची शयता आहे.

धनु : नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा.

मकर : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल.

कुंभ : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. काळ अनुकूल आहे. महत्वाचे काम टाळा.

मीन : सुख-शांतीचे वातावरण राहील. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कामाचा भार अधिक राहील. जुनी मित्र-मैत्रिणी भेटतील. जोखमीची कामे टाळा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर