आम आदमी पार्टी हा पर्याय असल्याने नागरिक जोडले जात आहे

0
23

नगर – हुकूमशाहीला विरोध आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी हा पर्याय असून, सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधक हे जनतेला मुर्ख बनवत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे-घेणे राहिले नाही. त्यामुळे हा पर्याय जनतेपुढे असल्याने नागरिक पक्षाशी जोडले जात आहे. सभासद नोंदणीस प्रतिसाद मिळत असल्याचे भरत खाकाळ यांनी सांगितले. पार्टीच्यावतीने अहमदनगर शहरात सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिल्लीगेट, श्रमिकनगर, नगर कॉलेज परिसरात या नोंदणीस प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ, महिला अध्यक्षा अ‍ॅड.विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, नितीन लोखंडे, कला-सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र समाल, विजय बोरसे उपस्थित होते. यावेळी प्रकाश वडवणीकर म्हणाले, पार्टीच्या सभासद नोंदणीस शुभारंभ झाला असून, दिल्लीगेट या ठिकाणी १०० च्या वरती सभासदांनी नोंदणी करून पार्टीचे हात बळकट करत असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड.विद्या शिंदे यांनी पुढील काही दिवस शहरातील विविध भागात सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी ९८९०७४९१९७ यावर संपर्क साधावा.