शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी महिलांनी योग, प्राणायमाकडे वळावे : धनश्रीताई विखे पाटील

0
31

सावेडीतील आंनद योग केंद्रात आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा

नगर – शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी महिलांनी योग, प्राणायम ाकडे वळावे. मनोबल वाढविण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त असून, महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबाच्या व्यस्त जीवनक्रमातून स्वतः साठी वेळ काढून आनंदी जीवन जगण्याचे धनश्रीताई विखे पाटील यांनी महिलांना आवाहन केले. सावेडीतील आंनद योग केंद्रात जागतिक महिला दिन आरोग्याचा जागर करुन साजरा करण्यात आला. महिला दिनी झालेल्या या कार्यक्रमात योग साधनेने महिलांना निरोगी जीवनाचे मुलमंत्र सांगण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमास वनसंरक्षक सुवर्णाताई माने व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी देखील महिलांशी संवाद साधला. सुवर्णाताई माने म्हणाल्या की, छोट्याशा गावातून खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतले व कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून वन संरक्षक अधिकारी झाले. महिलांनी केवळ संसाराच्या चार भिंतीत मर्यादित न राहता घराबाहेर पडावे. स्वत:मधील कौशल्य विकसीत करुन कर्तृत्व सिद्ध करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रियंका आठरे म्हणाल्या की, अनेक महिलांमध्ये विशेष कलागुण असताना देखील लग्नानंतर त्यांना संसारात अडकून पडावे लागते.

महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून आपल्या जीवनाचा प्रवास पुढे घेऊन जावा. संघर्ष करायला शिका, स्वावलंबी बना व स्वतःचे छंद जोपासून जीवनाचा आनंद घ्यावा. जीवनात चढ-उतार सुरू असतात त्यावर मात करून पुढे जाण्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्याध्यापिका लता मुथा यांनी बदलत्या कुंटुब व्यवस्था व महिलांची भूमिका यावर विचार मांडले. अलका कटारिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सोनल भंडारी यांनी पाहुण्यांना प्रवचनपर पुस्तके भेट दिली. यावेळी महिलांसाठी अपेक्षा संकलेचा यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळ घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उषा पवार, सोनाली जाधववार, मनिषा गायकवाड, पूजा ठमके, प्रतिक्षा गीते, सविता चौधरी, स्वाती वाळुंजकर, रेखा हाडोळे, शीतल दळवी, संगीता जाधव यांनी परीश्रम घेतले.