प्रभाग क्रमांक ६ मधील ताठेनगर परिसरातील पुलाच्या कामाचा शुभारंभ

0
41

प्रभाग क्रमांक ६ मधील ताठेनगर परिसरातील पुलाच्या कामाचा शुभारंभ

दना ताठे यांचे प्रतिपादन नगर – ताठेनगर परिसरात लोकवस्ती वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत असलेल्या या वसाहतींना जास्ती जास्ती जास्त मुलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. या परिसरात असलेल्या ओढयामुळे जाण्या-येण्यास मोठी अडचण होत होती. त्यामुळे या पुलाचे काम व्हावे, यासाठी विविध पाठपुरावा करण्यात आला. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करुन दिला. आज या पुलाच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने लवकरच हा पूल तयार होऊन नागरिकांची मोठी सोय होणार आहे. प्रभागातील नागरिकांचे प्रश्नांना नेहमीच आपण प्राधान्य देत ते सोडविले आहे. विकास कामांच्या माध्यमातून कायम नागरिकांच्या संपर्कात राहू, असे प्रतिपादन माजी नगरसेविका वंदना ताठे यांनी केले. प्रभाग क्रमांक ६ मधील ताठेनगर परिसरातील पुलाच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका वंदना ताठे, प्रमोद ताठे, विलास माने, प्रदीप ताठे, मनोज खेडकर, अरुण शिंदे, मयूर ताठे, भरत धाडगे, किशोर सुपेकर, पूजा जुनगरे, जयश्री ताठे, मीना पवार, निला जगताप, कल्पना रांधवणे, शिला रांधवणे, ज्योती ताठे व नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेब वाकळे म्हणाले, प्रभागातील नागरिकांना सर्व सोयीय्सुविधा देण्यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे करण्यात आली आहे. मुलभुत सुविधांबरोबरच प्रभागाच्या विकासात भर टाकणारे प्रकल्प झाल्याने एक आदर्शप्रभाग म्हणून विकसित झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांनीही प्रभागातील कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने चांगली विकास कामे झाली आहे. ताठेनगरमधील पूल होणे हे नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे होत तो आज मार्गी लागल्याचे समाधान आहे. यावेळी पावसाळ्यात ओढ्यामुळ नागरिकांची जाण्या-येण्यास मोठी गैरसोय होत होती. आज शुभारंभ होत पुलाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोज ताठे यांनी केले तर आभार अरुण शिंदे यांनी मानले.