फिटनेस आणि फनचा अनोख मेळ, धनश्रीताई विखे पाटील यांनी केले कौतुक
नगर – भल्या पहाटे एकत्र आलेल्या युवती, महिलांनी फिटनेस आणि फन याचा मेळ साधत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. सक्कर चौकातील आधुनिक अजिंय फिटनेस वर्ल्डने शी फिट या थीमवर महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भव्यदिव्य अशा या कार्यक्रमात महिलांनी फिटनेसचे धडे गिरवतानाच मजेदार खेळांचाही आनंद लुटला. महिला दिनाची अतिशय सुंदर सुरुवात झाल्याने सर्व सहभागी महिलांचे चेहरे खुलले होते. या कार्यक्रमास धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त केक कापण्यात आला तसेच बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास अजिंय फिटनेस वर्ल्डचे संचालक अभिजीत गायकवाड, गायत्री गायकवाड, अजित गायकवाड, विजया गायकवाड, अभिमन्यू गायकवाड, योगीराज पडोळे, सूरज साबळे, प्राजक्ता पालवे, वैशाली भिंगारदिवे, अजय डाके व सर्व स्टाफ उपस्थित होता. महिला दिनाची सुरुवात योगासनांनी झाली. विविध प्रकारचे आसने केल्यानंतर प्राणायाम करण्यात आला. यात वृक्षासन व एक मिनिटात सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली.
समृध्दी झिने यांनी सूर्यनमस्कार स्पर्धेत तर सुवर्णा शेकटकर यांनी वृक्षासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. फिटनेस अॅण्ड फन अंतर्गत सर्वांनी रस्सीखेच, बॉडी वेट एसरसाईज, जंपींग जॅक, फ्लोअर एसरसाईज केली. व्यायामाबरोबरच पुशअप, स्क्वॉट, फोर आर्म प्लॅन्क स्पर्धा घेण्यात आली. समृध्दी झिने यांनी सर्वाधिक पुशअप मारले. स्कॅटमध्ये पलक नागपाल तर फोर आर्म प्लॅन्कमध्ये चैताली गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सर्वात शेवटी झुंबा आणि डान्स कार्यक्रम झाला. डीजेच्या तालावर सर्वच महिला थिरकल्या. हिंदी, मराठी चित्रपट गीतांच्या तालावर सर्वांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. बेस्ट डान्सरचा किताब इशिका कालरा यांनी मिळवला. अतिशय नेटके नियोजन असल्याने सर्वांनाच कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटता आला. धनश्रीताई विखे पाटील यांनी जीमची पाहणी करून येथील अत्याधुनिक सोयी सुविधांची माहिती घेतली. त्या म्हणाल्या, आताच्या काळात चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विशेषत: महिलांनी आरोग्याची, आहाराची काळजी घेतली पाहिजे. अजिंय फिटनेस वर्ल्ड अतिशय अत्याधुनिक असून येथील व्यायामाच्या मशीनरी, ट्रेनिंग खूप प्रभावी आहे. व्यायामाबरोबरच पोषक आहारबाबतही येथे मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकालाच याठिकाणी शारीरिक व मानसिकदृष्ट्या फिट राहण्याचा मंत्र मिळतो, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुमारे ११०० महिलांनी सहभाग नोंदवला.