महिलांनी मतदानविषयी जागृत राहून मतदान केले पाहिजे

0
50

प्रांताधिकारी सुधीर पाटील यांचे आवाहन; महिला दिनानिमित्त कोहिनूर मॉलमध्ये जनजागृती अभियान


नगर – देशाने लोकशाही स्वीकारली असून, लोकशाहीत मतदान हे सर्वात महत्वाचे आहे. मतदानाने आपण देशात चांगल्या विचाराचे सरकार निवडून देऊ शकतो. मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. विशेष महिलांमध्ये मतदानाविषयी उदासिनता असते. परंतु महिलांनी मतदान विषयी जागृत राहून मतदान केले पाहिजे व इतरांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकशाहीचा हा उत्सव आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले. महिला दिनाचे औचित्य साधून कोहिनूर मॉल याठिकाणी महिलांना मतदान जनजागृती विषयी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसिलदार संजय शिंदे, स्वीप समिती सदस्य सुधीर उबाळे, अमित खर्डे उपस्थित होते. यावेळी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीपर पथनाट्य सादर केली. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार किती महत्त्वाचा आहे याबद्दल माहिती सांगितली मार्गदर्शन केले. तसेच तारकपूर बसस्थानक या ठिकाणीदेखील मतदार जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला.