विनायक देशमुखांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

0
39

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी खा. अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ना.विजयकुमार गावित, माजी आ.अमर राजूरकर, अहमदनगर दक्षिणचे भाजपा अध्यक्ष दिलीप भालसिंग, कोषाध्यक्ष दादासाहेब बोठे व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे नंदुरबार येथील माजीमंत्री पद्माकर वळवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रीमती अर्चना राठोड, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कुमार सोनवणे व अन्य पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केला.