उमेद सोशल फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा

0
38

सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर, महिला बचत गट मेळावा, व्याख्यान, कवी संमेलनाचा रंगला सोहळा

नगर – उमेद सोशल फाउंडेशन, नेचर कॅम्प व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमाने उत्साहात पार पडला. फाऊंडेशनच्या स्थापना दिनानिमित्त महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर, महिला बचत गट मेळावा, व्याख्यान, कवी संमेलन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाल. तर विविध क्षेत्रातील महिलांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्याक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवाजीराव कपाळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, सहाय्यक जिल्हा प्रकल्प अधिकारी धनंजय खेडकर, काकासाहेब म्हस्के, प्राचार्या डॉ. निलिमा भोज, डॉ. किरण वैराळ, डॉ. आम्रपली गायकवाड, जिल्हा रुग्णालय नेत्र विभागचे डॉ. सतीश आहिरे, मंत्रालयाचे सहाय्यक कक्ष अधिकारी प्रियांका गाडेकर, बारा बलुतेदार खादिग्राम उदयोगचे राजू करंदीकर, नेचर कॅम्पचे अपूर्वा तोरडमल, आदेश संचेती, आनंद संचेती, श्रीराम शिंदे, डॉ. संतोष गिर्‍हे, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे, सागर सप्रे, स्वाभिमानी संघटनेचे नाथा अल्हाट, कवी दशरथ शिंदे, शाईन पठाण, जालिदर साळवे, संदीप खोमणे, जय असोसिएशनचे जयश्री शिंदे, जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, रावसाहेब काळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे यांनी समाजातील गरजूंना आधार देण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे. तर महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी संघटना विविध उपक्रम राबवित असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित पाहुण्यांची महिला दिनानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घतेलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात महिलांच्या विविध स्पर्धा रंगल्या होत्या. यावेळी लावण्यात आलेल्या बचत गटाच्या विविध स्टॉलवर महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन करुन शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिलांची विविध आरोग्य तपासणी करुन, मान व गुडघेदुखी यावर उपचार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सचिव सचिन साळवी, सल्लागार अ‍ॅड. दीपक धिवर, खजिनदार संजय निर्मळ, सदस्य विजय लोंढे, रवी सुरेकर, प्रकाश भालेराव, योगेश घोलप, अण्णा जगताप, रवी साखरे, धीरज वाघचौरे, आरती शिंदे, युवा उद्योजक विनोद साळवे, उज्वला कुलकर्णी, पूनम गायकवाड, तनिज शेख, शर्मीला गोसावी, सुरेखा घोलप, शुभागी सोनवणे, शर्मिला रूपटक्के, प्रमिला गावडे, संजय बागुल आदींनी परिश्रम घेतले.