राष्ट्रीय पक्षांनी ओबीसीला प्रतिनिधित्व द्यावे अन्यथा निवडणुकीसाठी ‘उमेदवार’ देणार

0
54

मेळाव्यात सर्वानुमते ठराव मंजूर; नगर दक्षिणसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचे उमेदवार निवडून येतील

नगर – देशात लोकसभा निवडणूक थोड्याच दिवसात होणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी समाज वंचित राहिला आहे. ओबीसीचे मतदान ६५ टक्के असूनही ओबीसीचे खासदार निवडून येत नाही. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे. अशी मागणी ओबीसी समाजाच्या वतीने होत आहे. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत जर ओबीसी उमेदवार दिल्यास ओबीसी समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन माजी नगरसेविका डॉ. योगिता सत्रे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुलेनगर येथील सर्व मंगल कार्यालयात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी, एस.सी, बारा बलुतेदार, अलुतेदार समाजातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकता मेळावा झाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे. तसे न झाल्यास ओबीसी समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार देण्यात येईल. असा ठराव यावेळी सर्वानूमते करण्यात आला.

या मेळाव्यासाठी नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तालुयातील ओबीसी समाजाचे जि.प.सदस्य शरद झोडगे, माजी नगरसेवक सुरेश आंबेकर, अर्जुन बोरुडे, राजेंद्र पडोळे, भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, डॉ.रणजीत सत्रे, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली गायकवाड, अनिल इवळे, भाऊसाहेब कोल्हे, प्रसाद खामकर (हंगा, पारनेर), क्रांतीज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब जावळे (चांदा), डॉ.स्मिता तरटे (श्रीगोंदा), संजय आव्हाड, अ‍ॅड.राहुल रासकर, प्रकाश इवळे, नारायण इवळे, जालिंदर बोरुडे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, भरत गारुडकर, रामदास फुले, सुरेश रासकर, छाया नवले, मच्छिंद्र बनकर, सोन्याबापु जावळे, एकनाथ व्यवहारे, सरपंच विष्णू गायकवाड, सतिश कदम, योगेश गोरे, संजय रासकर, विकास रासकर (पारनेर), गोरख आळेकर (श्रीगोंदा), सुभाष आल्हाट, अ‍ॅड. प्रवीण पालवे, गजानन कुलाळ, भिकाजी पानसरे, ब्रिजेश ताठे, नितीन भुसारे, रमेश चिपाडे, अशोक हिंगे, अनंत गारदे, चंद्रकांत पुंड, पांडुरंग शिंदे, संजय ताजणे, देवेंद्र काळे, गणेश कोल्हे, अ‍ॅड. हरिश्चंद्र लोंढे, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी बन्सी बारवकर, सुभाष मेहेत्रे, सचिन शिंदे, वसंत राऊत आदी उपस्थित होते. माऊली गायकवाड म्हणाले, ओबीसी समाजात साखर कारखानदार, दूध संघ, बँकांचे अध्यक्ष नसल्याने ओबीसी समाजासाठी तळमळ करणारा, ओबीसीसाठी लढणारा ओबीसी कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी द्यावी.

रावसाहेब जावळे म्हणाले, ओबीसी समाजाने ओबीसी समाजाला मतदान करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ओबीसी समाज ६५ टक्के असल्याने नगर दक्षिण व उत्तर अशा दोन्ही जागांवर लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचे उमेदवार निवडून येतील. राजेंद्र पडोळे म्हणाले, ओबीसी समाजात आता मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने एक उमेदवार उभा करावा व ओबीसी समाजाने त्याला संपूर्ण पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. प्रसाद खामकर म्हणाले, नगरमध्ये महाएल्गार मेळाव्यास ओबीसी समाजाने उपस्थित राहून ताकद दाखवून दिली आहे. ओबीसी समाजाने लोकसभा निवडणुकीत एकजुटीने सामोरे जावे. तसेच ओबीसी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. सूत्रसंचालन सौ.रोहिणी बनकर यांनी केले आहे.आभार रमेश सानप यांनी मानले.