जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रीत सदस्यपदी दिलीप सातपुते आणि आकाश कातोरे यांची नियुक्ती

0
101

नगर – नगर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. दिलीप सातपुते हे सध्या शिवसेनेच शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय मानले जातात. शिवसेना पक्ष वाढीसाठी ते प्रयत्नशिल आहेत. माजी नगरसेवक राहिलेले दिलीप सातपुते यांनी अनेक विकास कामांसाठी पाठपुरावा करुन ती कामे करवून घेतली आहे. केडगांव व परिसरातील विविध विकास कामांसाठी ते नेहमीच अग्रही राहिले आहे. तसेच आकाश कातोरे हे सध्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असून, युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन केले आहे. त्याचबरोबरच शहरातील विविध प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असतात. विशेष नागापुर-बोल्हेगाव परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न करत आहेत. दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे.