आधुनिक मशिनरी व आत्मियतेने रुग्णांची काळजी घेणारे आनंदऋषी हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान

0
42

नगर – आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवसय्रात्र रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत. आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून या हॉस्पिटलच्या कार्याची महती ऐकत आलो आहे, आज प्रत्यक्ष शिबीराच्या उद्घाटननिमित्त हे रुग्णसेवेचे कार्य जवळून पाहण्याचा योग आला आहे. आधुनिक मशिनरी व आत्मियतेने रुग्णांची काळजी हे हॉस्पिटल घेत असल्याने पुणे-मुंबईला जाण्याची संकल्पना कालबाह्य झाली आहे. सर्वसुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने येथे आलेला रुग्ण पुर्णपणे बरा होऊनच जात आहे. मोफत व अल्पदरातील सेवामुळे रुग्णांवर उपचार होत असल्याने त्यांचा आर्थिक भार कमी होत आहे. त्याचप्रमाणे शासकिय योजना, मेडिलेम सुविधामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे.

तज्ञ डॉटर आणि आधुनिक मशिनरी आणि दानशूरांचे सहकार्य यामुळे हे हॉस्पिटल ‘रुग्णांसाठी वरदान’ ठरत असल्याचे प्रतिपादन आयएमएचे सचिव डॉ.सचिन पांडूळे यांनी केले. जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित कान,नाक, घसा/ त्वचारोग शिबीराचे उद्घाटन डॉ.सचिन पांडूळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सतीश पारख, सौ.अनिता पारख, अशोक छाजेड, सौ.सविता फिरोदिया, सौ. आकांक्षा फिरोदिया, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, डॉ.आशिष भंडारी, शिबीरातील तज्ञ डॉ.सुकेशिनी गाडेकर, वाचा व भाषा उपचार तज्ञ डॉ.अझर शेख, त्वचारोग तज्ञ डॉ.भास्कर पालवे, डॉ.अमित शिंदे आदि उपस्थित होते. याप्रसंगी सतीश पारख म्हणाले, आपल्या साधू-संतांनी जनसेवेचा दिलेला संदेश रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. या आरोग्य सेवेत जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते, डॉटर, स्टाफ देत असलेले योगदान हे कौतुकास्पद असेच आहे. यावेळी सौ.सविता फिरोदिया म्हणाल्या, जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून सुरु असलेले मानवसेवेचे व्रत कौतुकास्पद आहे. आचार्यश्रींनी दिलेल्या शिकवणीनुसार येथे रुग्णसेवा होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले तर आभार सतिश लोढा यांनी मानले. या शिबीरात कान, नाक, घसा ७० रुग्णांची तर त्वचारोग शिबीरात ८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.