छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे उपाध्यक्षपदी संजय मिसाळ

0
113

नगर – छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे उपाध्यक्षपदी संजय मिसाळ यांची निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम मुटकुळे यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. माजी अध्यक्ष संजय मिसाळ व उपाध्यक्ष दिलीप वारकर यांच्या एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पदं रिक्त राहिले होते. या पदासाठी १० मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे व उपाध्यक्षपदी संजय मिसाळ यांची निवड झाली. यावेळी दिलीप वारकर, प्रताप साबळे, ज्ञानेश्वर सुर्वे, सदानंद डोके, संतोष थिगळे, श्रीकांत साळे, राजेश तगरे, संतोष साबळे, गोटीराम मडके, रवी देशमुख, प्रशांत सातपुते, नवनाथ गोरे, हरीश भालेराव, किशोर जेजुरकर, संतोष खंडागळे, अर्चना गुंड, सुरेखा लांडगे यावेळी उपस्थित होते.