एमआयडीसी हद्द ते निंबळक बायपास चौक रस्त्याचे खा. सुजय विखेंकडून भूमीपूजन

0
43

नगर – तालुयातील नगर एमआयडीसीतील हद्द म्हणजे सावली हॉटेल पासून ते निंबळक बायपास चौक या रस्त्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखेंच्या हस्ते आणि माजी मंत्री व नगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सदर रस्त्यावर दिवस रात्र खूपच वर्दळ असते. हा रस्ता खूप खराब अवस्थेत होता. या रस्त्याने प्रवास करणारास नाहक त्रास सहन करावा लागत असे. सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत होता. निंबळक गावातील ग्रामस्थांनी आणि उबाठा सेनेने याबाबत निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केले होते. अखेरीस सर्व सोपस्कर पूर्ण करून या रस्ता सुधारणा कामाचे नारळ फोडून पूजन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आनंदीत आहेत. या प्रसंगी निंबळक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोतकर, दत्तात्रय कोतकर,प्रा. संजय जाजगे, अंकुश शेळके, विजय कोतकर, बाळासाहेब कोतकर, दत्तात्रय मुरलीधर कोतकर, छबुराव गायकवाड, दादा घोलप, दादा कोतकर, गोवर्धन कोतकर व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.