मुंबई-हैद्राबाद रेल्वेला महर्षी मार्कण्डेय नाव या मागणीला राज्यातील पद्मशाली समाजाने पाठिंबा द्यावा

0
36

नगर – पुणे येथील भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर जिंदम यांनी मुंबई-हैद्राबाद रेल्वे क्र. १७०३१ ला महर्षी मार्कण्डेय नाव देण्याची मागणी केलेली आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्रातील पद्मशाली समाजातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व अन्य क्षेत्रातील कार्यरत असलेले संस्था व संघटना तसेच व्हाट्सअ‍ॅपमधील ग्रुप धारकांनी पाठिंबा देण्याची मागणी अहमदनगर येथील पद्मशाली महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ. सुनीता कुरापाटी यांनी केले आहे. भारतातील धावणार्‍या विविध रेल्वेला अनेक समाजातील मान्यवरांचे नाव दिलेले आहे. समस्त भारतात पद्मशाली समाजाची संख्या मोठी असून देखील एका रेल्वेला सुद्धा नाव आढळून येत नाही. समाज संघटित असून देखील राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नसल्याचे दिसून येते हि उणीव भरून काढण्यासाठी समाजाने राजकीय क्षेत्रात वजन वाढविणे आवश्यक आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजे मुंबई-हैद्राबाद रेल्वेला महर्षी मार्कण्डेय नाव देण्याचे असल्याचे सौ. कुरापाटी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागणीला निता मंचे, ज्योति बिज्जा, सुषमा यादर, सुंकी शारदा, लता पुलगम यांच्यासह समाजातील महिलांनी पाठिंबा दिला आहे. या गोष्टीला व्यापक चळवळीचे स्वरूप देण्याची मागणी करण्यात आली.