कुटूंबाला एका धाग्यात गुंफण्याचे काम महिला करतात

0
78

श्री संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने ज्येष्ठ महिलांचा सन्मान

नगर – प्रत्येक कुटूंबाचा सर्वात महत्वाचा आधार ही महिला असते. कुटूंबाला एका धाग्यात गुंफण्याचे काम महिला करत असतात. सर्वांच्या आरोग्य बरोबरच सर्वांगिण विकासाची काळजी घेणारी महिला असते. परंतु स्वत:कडे तिचे लक्ष नसते. आपले आरोग्य, छंदाला मुरड घालत कुटूंब हेच तिचे विश्व असते. परंतु महिलांनी स्वत:कडे लक्ष देणे गरजेचे आहे, आपले आरोग्य चांगले असेल तर कुटूंब निरोगी राहू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. आज सन्मान झालेले व्यक्तीमत्व हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा त्याग आणि सांभाळलेल्या जबाबदारी ही कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रफुल्लता काकडे यांनी केले. सावेडी, शिंदे मळा येथील श्री संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्ष प्रमिला दुमाटे, महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रफुल्लता काकडे, सुवर्णा भस्मे, जयश्री नेवासकर, निर्मला लोळगे, जनाबाई चौकटे, प्रमिला बोधे, जयश्री सातपुते, सुजाता नेवासकर, जयश्री वायचळ, स्वाती अवसरकर, मनिषा चौकटे, रुपाली लोळगे, प्रतिभा काकडे, लक्ष्मी काकडे, उषा पाटकुले, मनिषा वडे, सौ.कमल बोडखे, संगिता बाचल, शोभा बोंडे, प्राजक्ता लोळगे, श्रृती लोळगे, ऐश्वर्या चौकटे, सुनंदा चौकटे, सौ. धोत्रे आदि उपस्थित होते. यावेळी आदर्शमाता म्हणून रत्नाबाई दगडू बगाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमिला दुमाटे म्हणाल्या, संत नामदेव महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात.

महिला दिनानिमित्त समाजातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. महिलांच्या उन्नत्तीसाठी महिला मंडळाचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये मनिषा पतंगे, निर्मला लोळगे, प्रफुल्लता काकडे या विजेत्या ठरल्या. यावेळी अन्नपुर्णा यांचाही गौरव करण्यात आला.यावेळी अंकशास्त्र तज्ञ सौ.अश्विनी धिरज गोलंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी अंकशास्त्राचे आपल्या जीवनातील महत्व आणि अंकांचे परिणाम या विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन जयश्री नेवासकर यांनी केले तर आभार निर्मला लोळगे यांनी मानले. यावेळी महिला उपस्थित होते.