पाद्यपूजा झाली पाहिजे ……. पण ती साधुसंतांची महाराजांची नव्हे

0
37

नगर – आमच्यासारखी महाराज मंडळींची रथातून मिरवणूक काढता आमची तेवढी उंची नाही, ज्ञानोबा-तुकोबांचा किती सन्मान व्हायला पाहिजे होता? पण त्या काळातल्या लोकांनी तुकोबारायांची झोळी फाडली…! मग त्यांना इतका त्रास झाला? तर आमच्या पायावर पाणी ओतून काय फायदा पाद्यपूजा झाली पाहिजे पण ती साधुसंतांची झाली पाहिजे महाराजांची नाही. साधु संतांच्या विचाराने सुसंकृत पिढी निर्माण होत असते, असे प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी केले. केडगाव येथे विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्र निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. केडगाव विश्वेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्र निमित्ताने गेल्या बारा वर्षापासून उदयनराजेनगर येथे भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गणेश सातपुते यांच्या पुढाकारातून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. या ही वर्षी मोठ्या उत्साहात सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी या सोहळ्याला ७ दिवस हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची किर्तन सेवा पार पडली. त्या कीर्तनाला केडगाव परिसरातून महिला आणि पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. सप्ताह यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांचे सप्ताह कमिटीच्या वतीने अध्यक्ष गणेश सातपुते यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची परिसरामधून रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली, आणि त्यांचे सभामंडपामध्ये गुलाब पुष्पांची उधळण करत सप्ताह कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी महिलांसाठी विविध भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या यामध्ये पहिले बक्षीस हे उदयनराजेनगर येथील भाविक अर्चना भागवत यांना ३२ इंची एलईडी टीव्हीचे भेटवस्तू म्हणून देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी सुरेखा भानुदास कोतकर, नगरसेविका लताताई शेळके, शकुंतला पवार, अध्यक्ष गणेश सातपुते, सागर सातपुते, सचिन बडे, महेश वाळके, मच्छिंद्र भांबरे, नितीन आजबे, कैलास नागरगोजे, कैलास भुक्कन, गुलाबराव पवार, जगन्नाथ आंधळे, गोरक्षनाथ कोकाटे, सोमनाथ सातपुते, गोरक्षनाथ कोतकर, अंबादास दहिफळे, विठ्ठल रोकडे, मेघा सातपुते, शुभांगी घोडके, दिपाली भांबरे, शितल आजबे, गणेश आर्टस्चे संचालक मुकुंद दळवी, भूषण गुंड, गोरक्ष कोकाटे, मच्छिंद्र भांबरे, नितीन आजबे, कैलास भुक्कन, प्रकाश इथापे, कुंडलिक कोल्हे, पवार सर, भाऊसाहेब कोल्हे, जगन्नाथ आंधळे मेजर, महेश घोडके, मयूर भोसले,राजू आंग्रे,मोहनेश मांढरे, महादेव बनसोडे, रमेश निक्रड, रामदास सुलाखे, शिवाजी मोढवे, मोकाटे महाराज, विनायक गाडेकर, तळेकर केबलवाले, विशाल सोनटक्के, कैलास नागरगोजे, रोहन धांडे, रोहित धांडे, महेश शिरसाठ, लक्ष्मण खेडकर मेजर, अशोक कारखिले, सचिन बडे, महेश वाळके, बाबासाहेब जवरे, विलास ढाळे, संजय निंबाळकर, उमेश आनारसे, शुभम निक्रड, राहुल आंग्रे, अविनाश मुसळे, बाबुराव खोसे, बाबुराव कटारे, संतोष उरमुडे सर, सागर भंडारी, योगेश कुमठेकर, स्वप्नील भागवत, योगेश शिंदे, दादा जपकर, बंडू जपकर, डॉ. निवृत्ती गाडगे यांसह परिसरातील भावीक उपस्थित होते.