शिक्षणामुळे मुलींनी शिकून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले : शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस

0
28

शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस

नगर – पुर्वीची चुल आणि मुल ही संकल्पना कालबाह्य होऊन आज महिलांची भुमिका बदलली आहे. शिक्षणामुळे मुलींनी शिकून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. आपल्या कर्तुत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाने स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. कोरोना काळात आरोग्य महिला आरोग्य कर्मचार्‍यांनी मोलाची भुमिका बजावली. नागरिकांच्या आरोग्या बरोबरच बालकांचे आरोग्याची काळजी घेण्याचे महत्वपूर्ण काम त्या करत आहेत. आज महिला दिनी महिला आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचा केलेला गौरव कौतुकास्पद आहे. केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोकराव कडूस, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर, रेणुकामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, केडगांव आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवता मानण्यात आले आहे.

काळानुरुप स्त्रींनी आपल्या कार्यसिद्धता समाजापुढे मांडत आपले कर्तुत्व समाजापुढे मांडले आहे. शिक्षणामुळे त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास होऊन मोठी क्रांती घडली गेले. स्त्रीयांनी शिक्षण घेत आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे दाखवून दिले आहे. आज १०वी पासून उच्च शिक्षणापर्यंत टॉप करणार्‍यांमध्ये सर्वात जास्त मुली आहे. त्यामुळे समाजाने स्त्री भ्रुण हत्या रोखून मुलींना शिक्षण दिले पाहिजे. आज आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान करुन महिलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सांगितले. यावेळी शाळेतील महिला शिक्षिका व गुणवंत विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पद्मजा केरुळकर यांनी महिला दिनाचे महत्व सांगणारी कविता सादर केले. सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले तर आभार एकनाथ होले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान तोडमल, साहेबराव कार्ले, बाबासाहेब कोतकर, धनंजय बारगळ, संतोष काकडे, गोविंद कदम, गोरक्ष कांडेकर, अजिनाथ ठुबे, रुपाली शिंदे, सुनिता कोरडे, रेणुका गुंड, संजय शिंदे, बाबासाहेब कावरे, गणेश गायकवाड, सुधाकर गायकवाड आदि उपस्थित होते.