नगरमधील ‘जिव्हाळा ग्रुप’तर्फे जागतिक महिला दिन साजरा

0
22

नगर – पारंपरिक बंगाली पेहराव, विविध गेम्स, गप्पा गाणी आणि धमाल मस्ती अशा वातावरणात जिव्हाळा ग्रुपच्या महिलांनी जागतिक महिला दिन साजरा केला. ग्रुपच्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना महिला दिनापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. यात महिलांनी सहभाग नोंदवला. आरजे प्रसन्न यांनी सूत्रसंचालन करून प्रत्येकीला खेळाचा आनंद मिळवून दिला. ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा, सचिव सविता काळे यांच्या नियोजनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला. खेळ पैठणीचा मध्ये विविध खेळ, स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी उखाणे घेतले. हास्यविनोदाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिला सदस्या यात सहभागी झाल्या होत्या. नेवासा येथील योगिता कडू, टाकळी ढोकेश्वर येथील वैशाली कटारिया, नगर येथील अलका बलदवा पैठणीच्या मानकरी ठरल्या. राखी गांधी यांना सोन्याची नथ बक्षीस मिळाली. ३ पैठणी साड्या देण्यात आल्या. सोन्याची नथ व जोडवे देण्यात आली. तसेच जिव्हाळा ग्रुपच्या सदस्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले. दीपक एजन्सीच्या पारस कासवा यांच्यातर्फे लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण अंजली बोरा यांनी केले. तेजस गांधी व मनोज बोगावत यांनी कार्यक्रमस्थळाचे नियोजन केले होते.