१० मीटर इनडोअर एअर रायफल आणि पिस्तुल शूटिंग रेंज सुरू

0
70

लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांनी साधले लक्ष्य 

नगर – रविवारपासून नगर-पाथर्डी रोड, भिंगार येथे इन्फिनिटी स्पोर्टस् असोसिएशनची सुरुवात लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी त्यांनी लक्ष साधले. असोसिएशनच्या माध्यमातून अहमदनगर शहरात प्रथमतः शूटिंग रेंज सुरू करण्यात आली आहे. खेळाडू या श्रेणीत त्यांचे कौशल्य वाढवतील. ऑलिम्पिक मानकांनुसार ही १० मीटर इनडोअर एअर रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज आहे. इन्फिनिटी स्पोर्टस असोसिएशनने त्याच्या स्थापनेवर मोठा खर्च करत भविष्यात या असोशिएशनच्या माध्यमातून विविध स्पोर्टस्संबंधी अद्यावत टर्फ, पिच व कोर्ट तयार करुन नगरकर खेळाडूंसाठी त्यांच्या कालगुनांना वाव मिळण्याकरिता त्यांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळवून देणार असल्याबाबत या वेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष हरीश नय्यर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या शूटींग रेंजमध्ये १० लेन्स आहेत जेथे १० खेळाडू एअर रायफल आणि एअर पिस्तूलने एकावेळी टार्गेटवर शूट (सराव) करू शकतील. या श्रेणीतील प्रशिक्षणासाठी दररोज दोन सत्रे घेण्यात येणार आहेत.

पहिले सत्र सकाळी ९.३० ते दुपारी १.३० आणि दुसरे सत्र दुपारी ३.३० ते ७ या वेळेत असेल तर सुरुवातीचे १० दिवस इंट्रोडटरी ऑफरमधे विशेष सवलत ही देण्यात येणार असल्याबाबत त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष ईश्वर बोरा यांनी देखील यावेळी सांगितले की, सर्वांगीण शिक्षणाचा भाग म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना खेळात देखील शिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय क्रीडा जीवनशैलीचे फायदे समजण्यास देखील संस्था वेगवेगळे मार्गदर्शनपर शिबिर व करियर कौन्सिलिंग, तसेच योगा, मेडिटेशन व शारीरिक व्यायाम (ब्रिस्क एझरसाइज) ची शिबिर या माध्यमातुन आयोजित करणार असल्याबाबत त्यांनी सांगितले. कर्नल ध्रुव एरिक नासिर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पोर्टस् असोसिएशनच्या माध्यमातून व त्यांच्या पुढाकारातून या स्पोर्टिंग फ्रेमवर्कमध्ये नैतिकता, पोषण आणि क्रीडा उत्कृष्टतेसाठी वैज्ञानिक दृष्टीकोन ही मूल्ये विकसित करण्याची योजना संस्था सर्व संचालकांच्या मदतीने आखत आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले तर विद्यार्थ्यांना व खेळ प्रेमींना आमच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी या रूपाने मिळेल याची आम्ही खात्री करू.

मुलांना आवश्यक प्रशिक्षण देणेकामी त्यांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी व त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी ते करू शकतील याकरिता सुशिक्षित कोच देखील याठिकाणी नेमण्यात आले आहे. यावेळी सौ. शीला निंभोरकर, लालचंद नय्यर, सौ. जयश्री एरिक नसीर, वायएमसीएचे सचिव डॉ. डी. जी भांबळ, अहमदनगर रायफल असोसिएशनचे सचिव छबुराव काळे, बॉसिंग असोसिएशन अहमदनगर आणि अहमदनगर पोलीस बॉसिंगचे सचिव शकील शेख, आयकर विभागाचे अहमदनगर झोनचे उप आयुक्त श्री. मुरई, जैन कांफ्रेंसचे अशोक (बाबूशेठ) बोरा, रोटरीचे पीडीजी शिरीष रायते, माजी राष्ट्रीय कराटे आणि किकबॉसिंग चॅम्पियन इरफान शेख, विधीतज्ज्ञ व हस्तरेखाशास्त्रज्ञ प्रफुल्ल कुलकर्णी, निवृत्त लेफ्टनंट कर्नल एस एस नागरे यांचे सन्मान करण्यात आले. यावेळी प्रोफेसर नैना ध्रुव नासीर, डॉ. प्रीती नय्यर, रोटरी प्रियदर्शिनीच्या प्रेसिडेंट इलेट मीनल बोरा व सेक्रेटरी इलेट स्वाती गुंदेचा, डॉ. कीर्ती कोल्हे, ऑझिलियम स्कूलच्या नितीका गुप्ता, तेजश्री अमरापुरकर, दीपा कंत्रोड, विजय कोठारी, हितेश गुप्ता, डॉ. कुणाल कोल्हे, मनीष नय्यर, चेतन अमरापुरकर, प्रसन्न खाजगीवाले, रितेश कंत्रोड, डॉ जावेद सय्यद, योगेश झंवर, सावन गुलाटी, गोविंद कनोजिया, मनीष बोरा, अतुल बोरा, महेश गुंदेचा, संस्थेचे खजिनदार शरद पठारे, सहसचिव मिस्टर डेव्हिड मकासरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन अध्यक्ष हरीश नय्यर यांनी केले तर उपाध्यक्ष ईश्वर बोरा यांनी आभार मानले.