महाशिवरात्रीनिमित्त शिव संदेश रथ यात्राचे उद्‌घाटन

0
20

नगर – महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य माहित व्हावे यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने शिव संदेश रथ यात्रा काढण्यात आली आहे. शिवदर्शन भवन ब्रह्माकुमारीज विद्यालय महावीर नगर सावेडी येथे या शिव संदेश रथ यात्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी केले. यावेळी बी के राजेश्वरी यांनी सचिन जगताप यांचे स्वागत केले. या शिव संदेश यात्रेचे आयोजन करण्यामागचा उद्देश सांगताना नगर सेवाकेंद्राच्या संचालिका बी के राजेश्वरी यांनी सांगितले की, या वर्षी संस्थेच्या वतीने ८८ वा शिवरात्री महोत्सव जगभरात १२३ देशात साजरा करण्यात येत आहे. महाशिवरात्री चे अध्यात्मिक रहस्य समजण्यासाठी लोकांना निमंत्रित करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त यासाठी विशेष साप्ताहिक कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे. तरी नगरकरांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी सचिन जगताप यांनी या शिवसंदेश यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी बी के सुप्रभा दीदी, बी के निर्मला दीदी, बी के डॉ दीपक हरके यांच्यासह संस्थेचे साधक उपस्थित होते.