कुस्ती क्षेत्रामध्ये खेळाडूंनी सातत्य ठेवत सराव करावा : सचिन जगताप

0
123

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी

नगर – विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना कुठल्याही क्षेत्रामधील स्पर्धेमध्ये भाग घेऊन जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो, कुस्ती क्षेत्रामध्ये खेळाडूंनी सातत्य ठेवत सराव करावा त्यातून चांगला खेळाडू निर्माण होईल. स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करीत आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी केले. क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आयोजित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ दिनांक ८ ते १२ मार्च दरम्यान उदगीर, लातूर येथे होत आहेत. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धासाठी अहमदनगर जिल्हा संघ वरिष्ठ पुरुष- फ्रिस्टाईल, वरिष्ठ पुरुष ग्रिको रोमण आणि वरिष्ठ महिला संघ निवड चाचणी खुल्या पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन जि. प. सदस्य सचिन भाऊ जगताप, पै. देवा शेळके, पै. युवराज करंजुले, पै. सोमनाथ राऊत, पै. उमेश भागानगरे, पै. अतुल कावळे, पै. शंकर खोसे, पै. रवींद्र वाघ यांनी केले, पुरुष संघ निवड चाचणी संभाजीराजे कुस्ती केंद्र, सावेडी येथे पै. शिवाजी चव्हाण व पै. संदिप गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. या निवड चाचणीमध्ये निवड झालेले कुस्तीगीर पुढील प्रमाणे: पुरुष फ्रि स्टाईल : ५७ किलो : पै. ओम वाघ, ६१ किलो : पै. अभिजित वाघुले, ६५ किलो : पै. अभिषेक धाडगे, ७० किलो : पै. गणेश शेटे, ७४ किलो : पै. सौरभ मराठे, ७९ किलो : पै. तेजस उल्लागड्डे, ८६ किलो : पै. अक्षय घोडके, ९२ किलो : पै. आकाश भिंगारे, ९७ किलो : पै. ऋषी लांडे, १२५ किलो : पै. मनोहर कर्डिले, वरिष्ठ पुरुष ग्रिकोरोमण, ५५ किलो : पै. संकेत सतरकर, ६० किलो : पै. वैभव जाधव, ६३ किलो : पै. अर्जुन शिंदे, ६७ किलो : पै. ओंकार खरमाळे, ७२ किलो : पै. शंकर धांडे, ७७ किलो : पै. अनंत गागरे, ८२ किलो : पै. लक्ष्मण धनगर, ८७ किलो : पै. लौकीक चौगुले, ९७ किलो : पै. मयूर जपे, १३० किलो : पै. युवराज कर्डिले आदींचा समावेश आहे. महिला संघ निवड चाचणी दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे पै.प्रवीण घुले, पै.गणेश शेळके यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यात वरिष्ठ महिला फ्रि स्टाईल : ५० किलो : पै.आयेशा शेख, ५३ किलो : पै. ऋतुजा बर्डे, ५५ किलो : पै.धनश्री फंड, ५७ किलो : पै. चैताली घुले, ५९ किलो : पै.दिशा सोनवणे, ६२ किलो : पै. भाग्यश्री फंड, ६५ किलो : पै.सोनाली मंडलिक, ६८ किलो : पै. शृंखला रत्नपारखी, ७२ किलो : पै. आकांक्षा शिर्के, ७६ किलो : पै.दिव्या शिलवंत आदींचा समावेश आहे.