छत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला भुईकोट किल्याचा इतिहास

0
53

‘गड, किल्ले संवर्धन’ अंतर्गत केले ‘श्रमदान आणि स्वच्छता’ 

नगर – नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित गडकोट किल्ले संवर्धन अंतर्गत १ दिवसीय कार्यशाळा अहमदनगर मधील भुईकोट किल्ला येथे ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७८ विद्यार्थी आणि नगर, नेवासा, बुर्‍हाणनगर येथील अजून ४ महाविद्यालयांमधील २४ विद्यार्थी असे एकूण १०२ विद्यार्थी आणि ४ शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांच्यासमवेत अमोल बास्कर हे देखील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भुईकोट किल्याचा इतिहास, तिथे असणारे बुरुंज, त्याचे वेगळेपण, किल्ल्याचा ब्रिटिशकालीन इतिहास, स्वातंत्र्य काळात या किल्ल्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक घडामोडी, तेथील भुयारी मार्ग इत्यादींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या १ दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील, त्याचबरोबर प्रा. अमेय कुलकर्णी, प्रा. अक्षय देखणे, प्रा. तेजश्री धंगेकर आदींनी मेहनत घेतली. महाविद्यालयामधून या कार्यशाळेसाठी प्रा. पी. जी. निकम, प्रा. ए. बी. काळे, निखिल बुधवंत, बी.आर. झावरे आदी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि श्रमदान देखील केले.