पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे उपक्रम वैशिष्ट्‌यपूर्ण व उपयुक्त

0
77

दीनदयाळ बालगोपाल बचत ठेव योजनेचा शुभारंभ

नगर – अहिल्याबाई होळकर या मातेने राष्ट्रला उभे करत संपूर्ण देशात पाणवठे निर्माण करून दुष्काळ निवारण्याचे मोठे पुण्याचे काम केले आहे. अशा अहिल्याबाईंच्या नावाने आता अहमदनगरचे नामांतर झाले आहे. अहिल्याबाईंनी केलेले दुष्काळ निवारण्याचे काम व नगरमध्ये असलेली पाण्याची परिस्थिती याचा मेळ घालण्याची नैतिक जबाबदारी सर्वांवर आहे. हा मेळ जर घातला गेला तरच पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर या नामांतराला अर्थ आहे. शहरातील सीना नाला व भिंगार नाल्याला स्वच्छ करून प्रवाहित करू त्याचवेळी हे नामकरण योग्यप्रकारे झाले असे म्हणता येईल. राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणार्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय त्यांच्या नावाने काम करणार्‍या पंडित दीनदयाळ पतसंस्था कायम वेगवेगळे उपयुक्त उपक्रम राबवत आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याच्या ठराव नुकताच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व मनापा आयुक्त पंकज जावळे यांनी केला. याबद्दल नगरच्या पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दीनदयाळ पतसंस्थेच्या दीनदयाळ बालगोपाल बचत ठेव योजनेचा शुभारंभही पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बालकांना छोटी छोटी कपाटे देवून करण्यात आला. खाऊचे पैसे साचवण्यासाठी आकर्षक छोटी कपाटे मिळाल्याने बालके हरखून गेले.

यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वंसत लोढा, मानद सचिव विकास पाथरकर, व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, अस्थापना प्रमुख मेहेर लहारे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक, पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरेश क्षीरसागर यांची समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल व अनिल सबलोक यांची भाजपा रेल्वे प्रकोष्टाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आयुक्त पंकज जावळे म्हणाले, वसंत लोढा यांनी सांगितल्याप्रमाणे नगर शहरात बर्‍याच समस्या अद्याप प्रलंबित आहेत. त्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून ठोस पावले उचलत आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागातून शहरास सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अहिल्यादेवीनगर नामांतरासाठी मी केवळ प्रशासकीय काम करून कर्तव्य बजावले आहे. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, नगरचे नामांतराचा विषय मागील एक वर्षांपासून प्रलंबित होता. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व मनापा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगरच्या नामांतरासाठी पुढाकार घेवून तसा ठराव केला आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. नगरची झालेल्या दुरावस्था दूर करण्यासाठीही प्रशासनाने असाच पुढाकार घ्यावा. यासाठी पोपटराव पवारांनी मार्गदर्शन करावे.

दीनदयाळ पतसंस्था ही बालगोपाल बचत ठेव योजना सुरु करणारी देशातील दुसरी व राज्यातील पहिली पतसंस्था आहे. बालकांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने एक ते १८ वर्षाच्या बालकांसाठी ही अभिनव बचत योजना आहे. वयाच्या महत्वाच्या टप्यात या योजनेची रक्कम सव्याज दिली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या बालकांना बचतीची सवय लागण्यासाठी व त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी या योजनेत सहभागी व्हावे. पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर यांनी स्वागत केले. संचालिका शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शैलेश चंदे यांनी आभार मानले. यावेळी संचालक निलेश लोढा, बाबासाहेब साठे, शैला चंगेडे यांच्यासह राजकुमार जोशी, मनीष लोढा, तुषार पोटे, शेखर गांधी, सुहास पाथरकर, मुकुंद मुळे, संजय वल्लाकट्टी, बापू ठाणगे, बाळासाहेब भुजबळ, दिगंबर गेंट्याल, गोकुळ काळे, सोमनाथ चिंतामणी, अग्रवाल, व्यवस्थापक निलेश लाटे व उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर उपस्थित होते