बोल फाऊंडेशन व संत जॉन चर्च युवक संघटना आयोजित रक्तदान शिबीर

0
15

नगर – बोल फाऊंडेशन व संत जॉन चर्च युवक संघटना आयोजित रक्तदान शिबीर ३ मार्च रोजी संत जॉन यूथ सेंटर, कॅम्प भिंगार या ठिकाणी झाले. जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सौजन्य व सहकार्याने हे शिबीर पार पडले. रेव्हरेंड फादर विश्वास परेरा, स्थानिक प्रमुख धर्मगुरु डॉन बॉस्को, जॉन चर्च यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली रक्तदानाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिस्ती समाजाद्वारे या प्रायश्चित व उपवासकाळात देऊळमाता प्रत्येकाने आपल्या अंत:करणात मनन व चिंतनाद्वारे स्वत:चे परिवर्तन करून समाज कल्याणकारी उपक्रम करण्यास प्रोत्साहन देते, ही संकल्पना अहम दनगर जिल्हामध्ये प्रथमच फादर अंतोन डिसोजा संत डॉन बॉस्को धर्मगुरुद्वारे प्रेरणा व उर्जेद्वारे राबवण्यात आली होती. हीच प्रेरणा व उर्जा घेऊन आजचे हे रक्तदान शिबीर ‘देणे समाजाचे’ या प्रेम व बंधुभावनेने यशस्वीरीत्या हे शिबीर पार पडले. या प्रसंगी ४० रक्तदात्यांनी रक्तदान करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला होता. यापैकी पाच महिला व दहा पुरुष या इच्छुक रक्तदात्यांना कमी वजन हिमोग्लोबीन कमतरता व वय या कारणांमुळे ते रक्तदान करू शकले नाही. एकूण २३ युवक, युवती, पुरुष, स्त्रीया यांनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी ब्रेड ऑफ लाईफ म्हणजेज बोल फाऊंडेशनच्या सचिव सौ. शोभा जोसेफ पाटोळे, अध्यक्ष जोसेफ पाटोळे, व्हॉलिंटीयर अमित पाटोळे, श्रध्दा पाटोळे यांनी हा विशेष कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे अंतोन पाटोळे, रवि मुदलियार, रूबेन मुदलियार, स्टिव्हन मुदलियार, मास्टर आरुष पाटोळे, काव्या पाटोळे यांचा सहभाग मोलाचा ठरला, युवक संघटनेचे अध्यक्ष अविनाश लॉरेन्स मरियादास व त्यांचे युवक मित्र सहकार्‍यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांची कामगिरी मोलाची ठरली. जनकल्याण रक्तपेढी, अहमदनगर या संस्थेचे डॉ. गुप्ता व डॉ. मढीकर व सेवकवृंद यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.