समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य, वाङमय दिशादर्शक : श्रीपाद कुलकर्णी

0
30

श्रीपाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन : दासनवमी निमित्त विविध गुणदर्शक प्रभात फेरी ठरली लक्षवेधी

नगर – समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य, वाङमय हे नेहमीच सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये आध्यत्मिक व बौद्धीकते बरोबरच आत्मविश्वास वाढीसाठी त्याचा बहुमोल उपयोग होत असतो. याच अनुषंगाने दासनवमी निमित्त श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांमधील विविध कला-गुणांचा विकास होण्यासाठी स्पर्धांचा उपक्रम राबविला. त्याचबरोबर प्रभात फेरीतील विविध गुणदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. अभ्यासबरोबरच असे उपक्रम नियमित राबविले जाणे गरजेचे आहे. मंडळाच्यावतीने श्री समर्थ रामदास स्वामीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न यानिमित्त होत असल्याचे प्रतिपादन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. दासनवमी निमित्त श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथ पालखीची प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी सेक्रेटरी प्रभाकर ओहोळ, कार्य.सदस्य श्रीपाद कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, सुनिल जोशी, मुख्याध्यापिका संगिता सोनटक्के, सतीष मेढे आदि उपस्थित होते. श्री समर्थ रामदास स्वामींच्या मुर्तीची सौ.सविता व श्रीकांत येवले यांच्या हस्ते पुजन करण्यात येऊन प्रभात फेरीस शुभारंभ करण्यात आला.

श्री समर्थ विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री समर्थ स्वामींची वेशभुषा परिधान केली होती. मुलींचे लेझिम पथक व मुलांचे वाद्य पथक सर्वांचे विशेष आकर्षण ठरले. ही प्रभात फेरी चौपाटी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ, गुजरगल्ली, विवेकानंद चौक, कोर्ट लेन, पटवर्धन चौक मार्गे पुन्हा सांगळे गल्ली येथे सांगता झाली. या फेरी दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर निंबाळकर, संदिप गायकवाड, तिलोत्तमा देशमुख, प्रमिला आल्हाट, वैशाली मगर, लिन बंगाळ, दिपा सप्तर्षी, अस्मिता गायकवाड, श्रीमती धोत्रे, नाटाळे, रंगनाथ देशमु, श्रृती कुलकर्णी, श्रद्धा नागरगोजे आदिंसह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी-पालक उपस्थित होते. ही प्रभातफेरी लक्षवेधी ठरली.