तिळवण तेली समाज ट्रस्टच्या मंदिरात श्री ओंकारेश्वर महादेव शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापणा

0
19

नगर – तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने महाशिवरात्री निमित्त संताजी भवन येथे श्री ओंकारेश्वर महादेव शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना विधीवत धार्मिक कार्याने करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव शोभना धारक, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ.निता लोखंडे आदि उपस्थित होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान म्हणून सौ.संगीता व प्रणव डोळसे, सौ.वैशाली व शशिकांत देवकर, सौ.सारिका व प्रकाश जुंदरे, सौ.वंदना व रामदास शेरकर, सौ.उर्मिला व स्वरुप नागले आदिंच्या हस्ते झाले. या विधीचे पौरोहित्य प्रणव रेखी गुरुजी व सहकार्यांनी केले. यावेळी धान्यपुजन, जलपुजन, होम हवन आदि वेगवेगळ्या पुजा करण्यात आल्या. याप्रसंगी प्रसाद शिंदे म्हणाले, दाळ मंडई येथील संताजी भवन येथे श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर आहे. तसेच देवीचे मंदिर, श्री दत्त महाराज, श्री शनी महाराज, प्रभु श्रीराम, संत संताजी महाराजांची भव्य मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

आता श्री ओंकारेश्वर महादेव शिवलिंगाची स्थापना आज होत आहे. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी दर्शन होणार आहे. वर्षभर येथे जयंती, सण, उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्यात भाविक सहभागी होत असतात. आजचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे. महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विजय दळवी, कृष्णकांत साळूंके, रमेश साळूंके, गणेश धारक, गणेश लोखंडे आदिंसह महिला उपस्थित होत्या. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.