नगरसह राज्यभरातील रूग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटलमुळे हक्काचा आधार : आमदार संग्राम जगताप

0
58

मोफत पोटविकार तपासणी शिबिराला प्रतिसाद

नगर – आचार्यश्रींच्या आशीर्वादाने सुरु झालेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमुळे नगरसह राज्यभरातील रूग्णांना हक्काचा आधार मिळालेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणून रूग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जैन सोशल फेडरेशन काम करीत असते. हॉस्पिटल बरोबरच आता शिक्षण क्षेत्रातही पदार्पण करीत आहे. भगवान महावीर युनिर्व्हसिटी उभारण्यात येत आहे. नवीन पिढी सक्षम होईल, ती देशाच्या भविष्य घडवेल यादृष्टीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी हॉस्पिटलच्या सेवाभावाचे कौतुक केले आहे. त्यांच्या माध्यमातून आता मनपाचे भव्य असे २८ कोटींचे हॉस्पिटलही उभारले जात आहे. फेडरेशनच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवूनच मनपाच्या हॉस्पिटलमधून सेवा दिली जाईल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे ३ ते ३० मार्च या कालावधीत विविध मोफत आरेोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांचा शुभारंभ पोटाचे आजार तपासणी शिबीराने झाला. पारस ग्रुपने शिबिरासाठी सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप व पेमराज बोथरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रा.माणिक विधाते, डॉ.विजय भंडारी, अभिजीत खोसे, संजय ताथेड, राजू शेटिया, वैभव वाघ, पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतिष बोथरा, संगिता बोथरा, प्रतिभा बोथरा, गौरव, रोहन, प्रसन्ना, श्रेया, दर्शिका, आर्यन बोथरा, सी.ए.आयपी अजय मुथा, माणकचंद कटारिया, तज्ज्ञ डॉ.राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले. प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. शिबिरात सर्व प्रकारचे यकृत व स्वादुपिंडाचे आजार तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरात गॅस्ट्रोस्कोपी २ हजार रुपयात, कोलोनोस्कोपी ३ हजार रुपयांत करण्यात आली. शिबिरात ६९ रूग्णांची तपासणी करण्यात आली.