केडगाव उपनगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
25

नगर – केडगाव उपनगर परिसरात राहणार्‍या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि.२९) सायंकाळी ४ ते ५.३० दरम्यान ही घटना घडली. याबाबत मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी (दि.२९) घरी होती. तिला दुपारी ४ ते ५.३० दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कशाची तरी फुस लावून पळवून नेले. फिर्यादी या घरी आल्यावर त्यांना घरात मुलगी दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी तिचा आजूबाजूला, मैत्रिणींकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला. पण ती न सापडल्याने अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. या वरून पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.