राज्यस्तरीय सब ज्युनियर फूटबॉल स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा मुलींचा संघ जाहीर झाला.
नगर – अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. नुकतेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धा भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली. या निवड चाचणीतून खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली असून, वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जळगावमध्ये होणार्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मुलींचा संघ रवाना झाला आहे. जिल्ह्याच्या संघात तनिष्का पाटील, अमृता सातपुते, आर्या महातेकर, स्वरा हिंगे, रिदा शेख, नंदिनी होळकर, पायल शिंदे, ऋतुजा गर्जे, जिज्ञासा दळवी, विद्या बडे, वंशिका संघराजका, शहेझीन शेख, भाग्यश्री उबाळे, स्वरा गंभीरे, आराध्या लांडे, एंजल वनारसे, अक्षरा गर्जे, सिया अडसुर या खेळाडूंचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याचा ४ मार्च रोजी पहिला सामना यवतमाळ विरुद्ध रंगणार आहे. फुटबॉल स्पर्धेसाठी मुलींच्या जिल्ह्याचा संघ उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव विटर जोसेफ, सदस्य जेव्हिअर स्वामी व पल्लवी सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आला असल्याची माहिती प्रशिक्षक जॉय जोसेफ यांनी दिली. प्रशिक्षक म्हणून पल्लवी सैंदाणे आणि संघ व्यवस्थापक म्हणून प्रियंका आवारे संघासोबत जात आहेत. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव रोनप लेस फर्नांडिस, रिशपालसिंग परमार, जोगसिंह मिनहास यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.