५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी : खा. डॉ. सुजय विखे पाटील

0
20

नगर – कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ३ महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापार्‍यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. सदरील कांदा हा बांग्लादेशात निर्यात केला जाणार असल्याची माहिती खा. सुजय विखे यांनी दिली. दरम्यान कांद्यावरील निर्यात बंदी उठवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. या भेटीत शेतकर्‍यांची कांद्याच्या भावाअभावी होणारी अडचण लक्षात आणून देत न्याय देण्यासंदर्भात सखोल चर्चा केली होती. आता तब्बल ५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाली आहे.