बाजार समितीतील ‘त्या’ ४५ गाळ्यांबाबत २९ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी

0
70

नगर – नगर तालुका बाजार समितीच्या आवारात सन 2017 साली बांधलेले अनाधिकृत गाळे पाडण्याचे आदेश छत्रबपती संभाजीनगर खंडपिठाने 30 जून 2023 ला दिले आहेत. तसेच सर्वाेच्च न्यायालयानेही 21 ऑगस्ट 2023 राेजी हे आदेश कायम ठेवलेले आहेत. या संदर्भात महापालिकेने तीन महिन्याच्या आत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिला हाेता. त्याचा अनुपालन अहवालाबाबत उच्च न्यायालयाच्या छत्रबपती संभाजीनगर खंडपिठात गुरुवारी (दि.29) दुपारच्या सत्रत सुनावणी हाेणार आहे. 2017 साली बाजार समितीच्या आवारात बांधलेल्या त्या अनाधिकृत 45 गाळ्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्तांनी केल्यानंतर बाजार समितीने राज्य शासनाकडे अपील करून स्थगिती आदेश मिळवले हाेते. ते अपील शासनाने ेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रबपती संभाजीनगर खंडपिठात हे अपील दाखल करण्यात आले हाेते. त्याची 30 जून 2023 राेजी अंतिम सुनावणी हाेऊन ते गाळे पाडण्याचे आदेश निकालात देण्यात आले हाेते. त्याबाबत बाजार समितीने व व्यापाèयांनी सर्वाेच्च न्यायालयात अपील केले हाेते. ते ेटाळत सर्वाेच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवलेले हाेते. या आदेशाचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका व बाजार समितीला दिलेला आहे. त्यावर छत्रबपती संभाजीनगर खंडपिठात गुरुवारी (दि.29) दुपारच्या सत्रत सुनावणी हाेणार आहे. दरम्यान तक्रारदार शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी महापालिका व बाजार समितीकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान हाेत असल्याचा तक्रार अर्ज खंडपिठात सादर केला असून त्यावरही निर्णय हाेण्याची शक्यता आहे.