नोबेल पीस अवॉर्डसाठी डॉ सुधा कांकरिया यांचे नामांकन

0
65

पुणे – नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. शांततेसाठी देण्यात येणार्‍या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अशा चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत. यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांचे नांव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे व नोबेल कमिटीने हे स्विकारलेले असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन विश्व शांतीदूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. सुधीर तारे यांनी केले. डॉ. सुधा कांकरिया गेल्या ४० वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्याबरोबर ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीत झोकुन देऊन कार्य करीत आहेत. १९८५ साली देशात पहिल्यांदा स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीची सुरूवात डॉ. सुधाताईंनी केली. जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची सन्मानपुर्वक नोंद झाली. २५ वर्षे बालरंगभुमीची सेवा. गेल्या १२ वर्षा पासून राजयोगा जीवनपध्दतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार करीत असुन कैदी बांधव, अंध बांधवांसाठी तसेच युवा विद्यार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवित आहेत. डॉ. सुधा यांनी ९००० पेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना मोफत हिलिंग सेवा पुरवली. सदर कार्यक्रमात डॉ. प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केले. डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी आभार मानले.