राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने मुलींच्या वतीगृहास जीवनावश्यक वस्तू भेट
नगर – सुमारे सहाशे वर्षांपूर्वी जेव्हा समाजाम ध्ये विषमता पसरली होती. स्पृश्य-अस्पृश्य आणि जातिभेद वाढला होता; तेव्हा संत रविदास महाराजांना कोणीही विनाअन्न राहू नये, सर्वांना समानतेने दोन वेळचे अन्न मिळावे असे अभिप्रेत होते. यासाठी त्यांनी त्या काळात जागृती करताना असे म्हटले होते की ‘ऐसा चाहू राज मैं, जहाँ मिले सबनको अन्न, छोट बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न’ आणि ही आजच्या काळाची पण गरज आहे, तेव्हा अन्नदान हे आजच्या काळात श्रेष्ठ असे दान आहे, असे त्यांनी सांगितले. संत रविदास महाराजांच्या विचारावर राष्ट्रीय चर्मकार महासंघ काम करत आज वस्तीगृहातील मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या असल्याचे याप्रसंगी राजेंद्र बुंदेले यांनी सांगितले. संतश्रेष्ठ गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने छत्रपती संभाजीनगर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहामध्ये जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्रा.माणिकराव विधाते, महासंघाच्या राज्य उपाध्यक्षा शोभाताई कानडे, जिल्हाध्यक्षा लताताई नेटके, महानगर अध्यक्ष विशाल बेलपवार आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थितांचे सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संपत बारस्कर म्हणाले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हा अत्यंत स्तुत्य असं उपक्रम आहे. समाजात ही भावना सातत्याने रुजली पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी वाद्य वाजंत्री, डीजे ला फाटा देऊन असे समाज हितोपयोगी उपक्रम राबवणे हेच खरे सामाजिक कार्य आणि हेच संतांचा विचारांचा गौरव असं मी समजतो, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी सातत्याने असे वेगवेगळे उपक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करत आहे. उपक्रमातून नेहमी वेगवेगळे संदेश देत राहतात. आज त्यांनी या कन्या वस्तीगृहातमध्ये जो अन्नदानाचा उपक्रम राबविला तो निश्चित कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी वस्तीगृहाच्या मुलींनी भाषणे आणि आपल्या सामाजिक कलाकृती सादर केल्या आणि वातावरण भारून गेलं. यावेळी पीडब्ल्यूडीच्या सहाय्यक अभियंता या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कु.अंबिका डमरे यांचा सन्मान राज्य उपाध्यक्षा शोभाताई कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल अण्णा बेलपवार यांनी केले. प्रसंगी महासंघाच्या अनेक पदाधिकार्र्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष लताताई नेटके यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी संतोष त्रिंबके, ज्ञानेश्वर म्हैसमाळे, दीपक पाचारणे, तेजस शिंदे, नितेश सोनवणे, सचिन वाघमारे, सुरेखा उदमले,अंबिका डमरे,रेखा कानडे, पूजा आहेर, अभिनव सुर्यवंशी, प्रशांत उदमले, सविता गायकवाड, गीता बोरुडे, हरि बोरुडे, वीर गोरे, शक्ती नरवैये, रमेश गायकवाड, युवराज बुंदेले, महेश आहेर, खेमराज बुंदेले, शिवाजीराव गायकवाड, प्रदीप सूर्यवंशी, विनोद बुंदेले, लोकेश बुंदेले, कार्यालय अधीक्षिका रजनी जाधव आदी उपस्थित होते.