५ देशातील व्यक्तींसहित अहमदनगरच्या डॉ. सुधा कांकरिया यांचा सक्रिय सहभाग

0
52

भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरचे कार्य दिशादर्शक; आंतरराष्ट्रीय रोटरी शांतता परिषद २०२४

नगर – छत्रपती संभाजीनगर येथील व्हिटस् हॉटेलच्या दालनात आंतरराष्ट्रीय रोटरी शांतता परिषद २०२४ नुकतीच यशस्वीरित्या झाली. ही परिषद रोटरी लब औरंगाबाद मेट्रो, तसेच रोटरी महिला लिडर ग्रुप एशिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ५ देशातील व्यतींचा सहभाग होता तसेच अहमदनगर येथील रोटरी लब ऑफ अहमदनगरच्या माजी अध्यक्ष तसेच रोटरी पीस सेंटरच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी ही रोटरी पीस सेंटरच्या कार्याची गतीविधी तसेच युवाशक्ती व शांतता या विषयावर प्रभावीपणे आपले विचार मांडले. या शांतता परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी दिल्ली येथील रोटरी फाऊंडेशनचे कोऑर्डिनेटर डॉ. एन. सुब्रामिनन हे होते. संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी रोटरी संभाजीनगर मेट्रोच्या अध्यक्ष आरती अयंगार, शांतता परिषदेचे आयोजक व कमिटी चेअरमन चंद्रकांत चौधरी, रागिनी कनदाकुरे, रोटरी महिला लिडर ग्रुप एशियाच्या चेअरमन शामश्री सेन, मिलिंद देशपांडे, स्वाती स्मार्त उपस्थित होते. नगर येथील रोटरी पीस सेंटरच्या संचालिका व राजयोगा जीवनपध्दतीच्या अभ्यासक डॉ. सुधा कांकरिया यांनी रोटरी पीस सेंटरची स्थापना, कार्य, प्रकल्प व भविष्य कालीन योजना यावर विवेचन केले. तसेच आजची तरूणाई व शांतता याविषयी आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की भारत देश हा तरूणांचा देश म्हणुन ओळखला जातो. आपल्या देशात इतर देशाच्या तुलनेत तरूणांची संख्या अधिक आहे. हेच आपल्या देशाचे बलस्थान आहे.

जेंव्हा अधिक अधिक युवक या शांती निर्माण प्रक्रियेत सहभागी होतील तेंव्हा जगात सर्वात अधिक शांतता भारताध्ये दिसुन येईल. स्वरपरिवर्तनातुनच विश्वपरिवर्तन होत असते त्यामुळे शांती ही कुठे बाहेर मॉल/ दुकानात विकत मिळत नाही ती आपल्या अंर्तमनातच असते. राजयोगा जीवन पध्दतीद्वारे आपण अंर्तमनापर्यंत पोहचुन गहन मधुर शांतीचा अनुभव करू शकतो व इतरांनाही ती दान करू शकतो. रोटरी पीस सेंटरच्या वतीने विशेषत: १००० शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेले संघटीत मेडिटेशन, तसेच खास अंध बांधवांसाठी वर्षभर चालणारे शांतता व कौशल्य वर्धक कोर्सेस, अनेक कॉलेज मधील तरूणाईसाठी आयोजित केलेले राजयोगा मेडिटेशनचे सेमीनार तसेच कारागृहातील कैदी बांधवाची मन:स्थिती समजावुन घेऊन त्यांच्यामध्ये खास राजयोगा मेडिटेशन द्वारे मन:शांतीचे कोर्सेस यशस्वी रित्या घेण्यात आले. या सर्वांबद्दल माहिती सांगुन डॉ. सुधा कांकरिया यांनी सर्व तरूणाईला ‘शांतीदूत’ बनण्याचे आवाहन केले व स्वरचित ‘चले हमतुम शांतीदुत बन जाए‘ ही कविता सादर केली. त्यानंतर परिषदेमध्ये उपस्थित सर्वांचा विश्वशांतसाठी राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करून घेतला. सर्वांनीच गहन मधुर शांतीचा अनुभव घेतला. आरती अयंगार यांनी स्वागत केले. प्रांतपाल स्वाती हेरकल यांचा संदेश वाचुन दाखविण्यात आला. चंद्रकांत कुलकर्णी यांनी शांतता परिषदेची भुमिका मांडली ते म्हणाले पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर रोटरीची शांतता परिषद होत आहे व ५ देशातील शांतता तज्ज्ञ आपापले विचार मांडणार असुन दुबई, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, भारत यांचा सहभाग आहे असे ते म्हणाले. मनोज लोहिया यांनी शांतता परिषदेचे कौतुक करून शांततेसाठी विचार मंथन वारंवार व्हावे व ते कृतीतुन समाजापर्यंत जावे तसेच शिक्षणपध्दतीत सकारात्मक बदल व्हावा व मिडियानेही शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भुमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. एन सुब्रमिनन यांनी जागतिक शांततेचा राजमार्ग या बाबत बोलतांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी रोटरीची भुमिका स्पष्ट केली. रोटरीचे पहिले ध्येय आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करणे हेच आहे. रोटरी आपल्या अनेक वेगवेगळया सेवा कार्यातुन शांततासाठी सदैव पुढाकार घेते.

रोटरीने अनेक देशांना पोलिओमुक्त करून आजारपणामुळे होणारी अशांतता समाप्त करून शांतता प्रस्थापित केले आहे. जगामध्ये असलेल्या अनेक देशामध्ये रोटरीच्या माध्यमातुन एकमेकांची संस्कृती समजुन घेऊन एकमेकांचा आदर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परस्पर स्नेह-आदर-मैत्री जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे असे ते म्हणाले. उद्घाटन समारंभानंतर विविध व्यक्तींनी आपले विचार मांडले, शामश्री सेन यांनी जागतिक रोटरीचे ध्येय व शांतता, माणुसकी जिवंत राहण्यासाठी शांतता या विषयावर नेपाळ निवासी मोहन कृष्णा श्रेष्ठा यांनी विचार मांडले. मलेशिया येथील दातो बिन्दी यांनी जागतिक शांततेमध्ये येणार्या अडथळयावर प्रकाश टाकला, जयश्री छाब्रानी (नागपुर) यांनी शांतीची निर्मिती व त्यामुळे रोटरी लबची जबाबदारी यावर आपले मत व्यक्त केले. मुंबई येथील एलसामेंटी सिलव्हा यांनी रोटरी द्वारा संचलित विविध शांतता कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ. तनवीर अहमद यांनी शांती स्थापनेसाठी मिडियाची जबाबदारी या विषयावर तर तनुजा सोमाणी यांनी शांतता प्रस्थापनेसाठी शिक्षण पध्दती, मोना भुमकर यांनी शांतता पालकांची जबाबदारी, तर दिल्ली येथील आभा चौधरी यांनी शांतता व महिला यावर आपले मौलिक विचार मांडले. सदर शांतता परिषदेमध्ये ई बुलेटीन प्रकाशित करण्यात आले. संध्याकाळी उशीरा ऋतुरंग हया सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा आस्वाद सर्वांनी घेतला.