सक्षम नेतृत्वामुळे चांगली विकासकामे होतात : आ. संग्राम जगताप

0
49

सारसनगर आंबेकर मळा येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा

नगर – शहरातील सारसनगर उपनगराचा नियोजनबद्ध विकासकामे केली असल्यामुळे प्रलंबित कामे कायमस्वरूपाची मार्गी लागली, आता ही विकासकामे पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही, यासाठी सक्षम नेतृत्व निवडून देणे गरजेचे आहे, हे काम सारसनगर वासियांनी केले आहे, आता पुढील काळात सारसनगर परिसरातून वाहणार्‍या भिंगार नाल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे, त्यामुळे सारसनगर भागासह शहराच्या सौंदर्यकरणात भर पडेल, सारसनगरला जोडणार्‍या भिंगार नाल्यावरील पुलाचे काम देखील मार्गी लावल्याने दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, ज्या परिसरात विकास कामे होतात त्या भागात नागरी वसाहती वाढत असतात, यासाठी शहराच्या सर्वच भागात विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, टप्प्याटप्प्याने ही सर्वच विकास कामे मार्गी लागली जातील असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

सारसनगर आंबेकर मळा येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण आ. संग्राम जगताप हस्ते झाले. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सुरेश आंबेकर, नाना फुलसौंदर, महादेव कराळे, प्रकाश कराळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते गणेश भोसले म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांनी माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने व नागरिकांच्या सहकार्याने झालेल्या नियोजनबद्ध विकास कामांमुळे सारसनगर भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे, आंबेकर मळा येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले असून येथील नागरिकांना चांगल्या स्वरूपाचा रस्ता तयार झाला आहे तसेच दळणवळणाचा प्रश्न मिटला आहे, असे ते म्हणाले, प्रकाश भागानगरे म्हणाले की, प्रभाग १४ मधील सारसनगर भागात मार्केट यार्ड, महात्मा फुले चौकापासून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागले आहे, लवकरच सहकार सभागृह येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे, असे ते म्हणाले.