डॉक्टरच्या घरातून चोरी; १ लाखांची रोकड लंपास

0
38

नवनागापूर येथील घटना; अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल

नगर – डॉटरच्या घराच्या खालील मजल्यावर असलेल्या लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकटून आत प्रवेश करत घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेली १ लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नवनागापूर येथील आनंदनगर येथे रविवारी (दि.१८) सकाळी १०.४५ ते सोमवारी (दि.१९) सकाळी ९.३० या कालावधीत घडली. याबाबत आयुब अकबर इनामदार (वय ५५, रा. आनंदनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी इनामदार यांचे आनंदनगर येथे इनामदार लिनिक असून त्याच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. रविवारी (दि.१८) सकाळी १०.४५ च्या सुमारास घराला तसेच लिनिकच्या शटरला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते पुन्हा घरी आले असता त्यांना लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकटलेली दिसली. तसेच घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता कपाटातील १ लाखांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.