दोन वर्षापासून नगर जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांची ‘पिळवणूक’

0
46

नगर – अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय ठेकेदारांच्या थकीत बिलाची रक्कम त्वरित मिळण्याच्या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दरे, उपाध्यक्ष संजय गुंदेचा, सचिव उदय मुंढे, संतोष धुमाळ, आर.एन.रेपाळे, एम.व्ही. दराडे, पंकज वाघ, व्ही. व्ही. तवले, ए.पी.घुले, अमित तोरडमल, अमोल कदम, राहुल शिंदे, प्रीतम भंडारी, देविदास खरात, दादासाहेब थोरात, आर. एच.दरे, किरण पागिरे, मिटू धांडे आदीसह ठेकेदार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मागील २ वर्षापासून नगर जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांची जी पिळवणूक शासनाने चालवलेली आहे. त्यासंबंधी निवेदन देण्यात आले व कुठल्याही कामाला १० ते १५ टक्के पैसे येतात व पूर्ण स्वरूपात देयके दिली जात नाही. त्यामुळे सर्व ठेकेदार अडचणीत सापडले आहे. कामामध्ये कोट्यवधी रुपये अडकून बँकेचे कर्ज थकलेले आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा करत आहे. ५० वर्षाच्या काळामध्ये असे कधीही झाले नाही. परंतु याच दीपावलीला ठेकेदारांना पैसे देण्यात आले नाही. ठेकेदार, लेबर, कर्मचारी यांनी २०२३ ची दिपावली साजरी केलेली नाही. याचा देखील प्रशासनाला कोणताही दुःख नाही. त्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंतची ठेकेदारांची सर्व थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावीत तसेच निधीअभावी किंवा कमी निधी असेल अशा मुदत संपलेल्या सर्व कामांना आपल्या स्तरावर एकतर्फी मुदतवाढ द्यावी तसेच थकित बिलाच्या रकमा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ५० टक्के निधीची तरतूद असल्याशिवाय नवीन कामाच्या निविदा काढू नये तसेच कोणत्याही कामाच्या बिलाला विलंब झाल्यास ठेकेदाराला १२ टक्के व्याजासह बिल अदा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.