नगर शहरातील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; २० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त; १५ जनावरांची सुटका

0
106

नगर – नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिद जवळ असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.१३) पहाटे मोठी कारवाई करत सुमारे २० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर यावेळी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १५ जनावरांचीही सुटका केली आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मंगळवारी (दि.१३) पहाटे १.३० च्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, नगर शहरात झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिद जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयजवळ एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असून कत्तलीकरीता काही गोवंशीय जनावरे आणलेले आहेत. ही माहिती मिळताच पो. नि. दराडे यांनी तात्काळ रात्रगस्त घालणारे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना तेथे छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने पहाटे २.१५ च्या सुमारास तेथे जावून छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी पंचासमक्ष ३ मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, १२ गोवंशीय जनावरे व ३ म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे ६०० किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुण २० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला. सदरचा कत्तलखाना चालविणारे आरोपी अरबाज खलील शेख (वय २३, रा. कोठला, अहमदनगर), फैजल अस्लम शेख, (वय २०, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट), सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी (रा. झेंडीगेट, अहमदनगर) यांच्याविरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम २६९, महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (अ), ५ (क ), ९, ९(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९६० चे कलम ११, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रविण पाटील, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, संकेत धीवर यांनी केली आहे.