मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकार चौकात लावलेला शुभेच्छा फलक फाडला

0
21

नगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पत्रकार चौकात लावण्यात आलेला शुभेच्छा फलक अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी (दि.१०) रात्री फाडला. फलक फाडल्याचे रविवारी (दि.११) सकाळी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यां च्या लक्षात येताच त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. चंद्रकांत सुर्यभान शेळके (वय ४७, रा. गणेश चौक) यांनी तक्रार दिली असून, अज्ञात व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तक्रारदार शेळके यांनी शुभेच्छा देण्यासाठीचा फलक येथील पत्रकार चौकात लावला होता. सदरचा फलक शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फाडला. हा प्रकार रविवारी सकाळी लक्ष्यात आला. यानंतर शेळके यांच्यासह पदाधिकार्‍यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. फलक फाडणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. शेळके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पत्रकार चौकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून फलक फाडणार्‍याचा शोध घेऊ, असे आश्वासन पोलिसांनी त्यांना दिले आहे.