रेव्हेन्यू सोसायटीच्या निवडणुकीत ‘समृद्धी विकास पॅनल’चा विजय

0
41

नगर – रेव्हेन्यू अँण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हन्मेंट को-ऑप.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १० फेब्रुवारीला ९६ टक्के मतदान झाले. ११ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे १०४२ सभासद आहेत. यात महसूल कर्मचारी, तलाठी, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी सभासद २०२४-२९ या पंचवार्षिक कालावधीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, एकता पॅनल विरुद्ध समृद्धी पॅनलमध्ये ही लढत होती. यामध्ये समृद्धी विकास पॅनल चा एक हाती विजय झाला. सर्वसाधारण मध्ये गणेश गर्कळ, राजेश घोरपडे, प्रदीप चव्हाण, संदीप तरटे, बाबासाहेब दातखिळे, प्रवीण बोरुडे, संतोष मांडगे, सुरेश राऊत, हरिभाऊ सानप, विजय हरिश्चंदे, व अनुसूचित जाती जमाती मध्ये प्रदीप अवचर, महिला प्रतिनिधी वृषाली करोसिया, सुनंदा मरकड, इतर मागासवर्गीय मध्ये सनी जाधव व भटया विमुक्त विकास मोराळे यांचा दणदणीत विजय झाला. यावेळी तहसील कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत ढोलच्या तालावर आनंद साजरा करण्यात आला.