आमदार चषक जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा शुभारंभ

0
76

सहकार क्रीडा मंडळ व दिग्विजय क्रीडा मंडळ आयोजित

नगर – सहकार क्रीडा मंडळ अहमदनगर व दिग्विजय क्रीडा मंडळ भिंगार आयोजित आमदार चषक जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन नारळ वाढून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हा अध्यक्ष रेश्माताई आठरे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, सुमित कुलकर्णी, निर्मलचंद्र थोरात, अजय पवार, राजेंद्र निंबाळकर, सुधिर चपळगावकर, राहुल चव्हाण, भरत थोरात, संजय शिरसागर, सुनिल थोरात, राजेंद्र धिरडे, कैलास साबळे, रावसाहेब बाबर, मनिष ठिबक, चंद्रशेखर झोडगे, बाळासाहेब गोंधळे, उन्मेश शिंदे, सुदर्शन ढवळे, अभिजीत खरपुडे, रवींद्र बाकलीवाल, रुपेश भंडारी, वसंत राठोड, संजय सपकाळ, ईश्वर भंडारी, शेखर चिंनचीने, रुपेश पसपुल, बाळू खामकर, आदिनाथ जाधव, राहुल फुलसंदर, शिवम भंडारी, गणेश वारुळे, अविनाश भालेराव, प्रवीण शिर्के, सचिन शिरसाट, सचिन वाल्हेकर, अशोक कळसे, विकास परदेशी, अंकुश साप्ते, तहसील सौदागर, कल्पेश पोखरकर, दीपक मगर, अभय एडके आदींसह खेळाडू उपस्थित होते.

सहकार क्रीडा मंडळ व दिग्विजय क्रीडा मंडळ आयोजित आमदार चषक जिल्हास्तरीय खो-खो ही स्पर्धेसाठी खुला गट मुले व १४ वर्षाखालील मुले अशा दोन गटात खो-खोई स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये खुल्या गटांमध्ये दहा संघ व १४ वर्षाखालील मुले हे बारा संघ आलेले आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे. क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. व जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात अभिजीत खोसे यांनी या खेळाचे महत्त्व विशद करत पाहुण्यांचा परिचय करुन दिला व नगर जिल्ह्यात अशा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे चांगले खेळाडु तयार होतील व राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील मुले झळकतील.