धीरज जोशीवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

0
25

ब्राह्मण महासंघ व बन्सीमहाराज परिवाराचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

नगर – बन्सीमहाराज मि ठाईवालेचे धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्‍याना त्वरित अटक करावी यासाठी सकल ब्राह्मण समाज महासंघ नगर जिल्हा व बन्सीमहाराज परिवाराच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला याना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोतदार, विजय देशपांडे, राजेश भालेराव, नंदकुमार पोळ, प्रभाताई भोंग, श्रुती मनवेलीकर आदींसह जोशी परिवारातील अशोक, राजकुमार, संजय, गोविंद, अनिल उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे कि १० फेबुवारी रोजी सायंकाळी अहमदनगर शहरातील मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ते आपले दैनिक कामकाज करुन घराकडे जात असतांना त्यांना बंदूकीचा धाक दाखवून तलवारीने मारहाण करण्यात आली. सकल ब्राह्मण समाज महासंघ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो व आरोपींना अटक व कठोर शासन न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करु. नगर शहरात वारंवार घडणार्‍या व्यापारी व सर्व सामान्यांवर होणार्‍या हल्याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व दोषींवर कायद्याने कडक कारवाही करावी यावेळी बोलताना समाज बांधव म्हणाले, धीरज यांचा कोणाशी वाद नाही, भांडण नाही तरी हल्ला का झाला, पहिले पिस्तूल म्हटले व आता ते लायटर होते अशी बातमी आली नक्की काय होते? यावर बोलताना ओला म्हणाले, एकूण ४ टीम तपास करत आहे. विविध ठिकाणचे फुटेज तपासले जात आहे. लवकरच आरोपी निष्पन्न होईल. जेथे हल्ला झाला तिथे फुटेज तपासले आहे व तपास चालू आहे. यावेळी महिलांनी आम्हाला येथे राहण्यास भीती वाटते असे सांगितले. तेव्हा ओला म्हणाले, आरोपी पकडेपर्यंत पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल. १२ वीच्या परीक्षेला मुलीसोबत महिला पोलीस दिली जाईल व काही वाटले तर मला कॉल करा असेही ते म्हणाले.