निखिल वागळे, ॲड.सरोदे, डॉ. चौधरींवरील भ्याड हल्ल्याचा शहर काँग्रेसकडून निषेध

0
14

नगर – नुकत्याच पुणे येथे निर्भय बनोच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अ‍ॅड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार आहे. लोकशाहीची राजरोसपणे हत्या केली जात आहे, अशी टिका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. चितळे रोड येथे कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्याचा निषेध करत निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी दशरथ शिंदे, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, युवक उपाध्यक्ष गौरव घोरपडे, साफसफाई कामगार संघटनेचे सचिव विनोद दिवटे, दिव्यांग विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

व्यावसायिकावरील हल्ला प्रकरणाचाही केला निषेध

नगर शहरातील सावेडीतील व्यावसायिक बन्सीमहाराज मिठाईवालेचे धीरज जोशी यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेचा देखील आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत. लवकरच याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून त्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे किरण काळे म्हणाले.