भाजपचे अनिल मोहिते यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
नगर – केडगाव मधील रस्त्यांच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. केडगाव मधील रस्त्याची दुरावस्था दूर होण्यासाठी भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस अनिल मोहिते यांनी पुणे येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन रस्त्यांसाठी १० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याचे निवेदन दिले. तर केडगावच्या रस्त्यांच्या दुरावस्थेची माहिती दिली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे केडगाव अध्यक्ष सुजय मोहिते उपस्थित होते. केडगावच्या प्रभाग १६ मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी भरीव निधीची गरज असल्याचे मोहिते यांनी निवेदनात म्हंटले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सखोल माहिती घेऊन लवकरात लवकर केडगावच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे यावेळी आश्वासन दिले.