रस्त्यात अडवून मारहाण करत तीघा जणांनी युवकाला लुटले

0
114

५ हजारांची रोकड हिसकावली, एमआयडीसी परिसरातील घटना, गुन्हा दाखल

नगर – एमआयडीसी परिसरात २५ वर्षीय युवकाला तिघा जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करत त्याच्या जवळील ५ हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (दि.९) सायंकाळी ५.३० च्या सुमारास हॉटेल वेलकम समोर घडली. याबाबत चंदनकुमार पासवान (वय २५, रा. आकाश कंपनी, एमआयडीसी) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पासवान हा रस्त्याने जात असताना हॉटेल वेलकम समोर त्यांच्या ओळखीचा सुनिल निकम व त्या सोबत असलेल्या २ अनोळखी युवकांनी त्यास अडविले. निकम हा त्याच्या कडे पैसे मागू लागला. त्यावेळी त्याने माझ्याकडे पैसे नाहीत असे असे सांगितले असता तुझा काल पगार झाला आहे, तरी तु खोटे बोलत आहे असे म्हणत शिवीगाळ करून त्यास मारहाण सुरु केली. तु पैसे दे नाही तर तुला जीवे ठार मारू अशी धमकी देत लाकडी दांडयाने जबर मारहाण केली. त्यावेळी निकम याने त्याच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेत पुन्हा या भागात दिसला तर तुला जीवे ठार मारू अशी धमकी देत ते तिघे तेथून निघून गेले. या बाबत पासवान याने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी सुनिल निकम व २ अनोळखी युवक अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.