मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बिगर सिंचन संस्थांनी पाणीपट्टीची थकीत रक्कम १५ फेब्रुवारीपर्यंत भरा

0
52

नगर – मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बिगर सिंचन संस्थांना वेळोवेळी मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येतो. ग्राहकांनी पाणीपट्टीच्या रक्कमांचा नियमित भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीची रक्कम थकीत आहे. बिगर सिंचन ग्राहकांनी त्यांच्याकडील पाणीपट्टीची रक्कम रोखीने अथवा डिमांट ड्राफ्टने १५ फेब्रुवारी पर्यंत भरण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे. जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागामार्फत ज्या पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरविण्यात येते त्यापैकी अहमदनगर महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ओद्यौगिक विकास महामंडळ (स्थापत्य उपविभाग), पांढरीपुल, नगर परिषद, राहुरी, नगर परिषद, देवळाली, बारागांव नांदूर व १४ गावे पाणी पुरवठा योजना, कुरणवाडी व चिंचाळे पाणी पुरवठा योजना, मिरी व २२ गावे पाणी पुरवठा योजना, बुर्‍हाणनगर व ४८ गावे पाणी पुरवठा योजना, सोनई करंजगाव पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत, वांबोरी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, ग्रामपंचायत, सडे पिंप्री व भेंडा कुकाणा पाणी पुरवठा योजना या योजनांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. बिगर सिंचन ग्राहकांनी त्यांचेकडे असलेली पाणीपट्टीची थकबाकीची रक्कम मुदतीत जमा करावी. अन्यथा करारनाम्यातील अटी व शर्तीमधील अट क्र. ९ नुसार पाणीपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता खंडीत करण्यात येईल, त्यामुळे होणार्‍या जनक्षोभास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.