समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आपण काम केले पाहिजे : दिलीप सातपुते

0
92

नगर – समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कार्यक्षमपणे काम करत आहेत. जनतेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून व्हावा, जनसेवेत साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळेच नगर शहर शिवसेनेच्यावतीने अनाथ बालकांना मिष्ठान्न भोजन दिले. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आपण काम केले पाहिजे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही अशा घटकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले. नगर शहर शिवसेना व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्यावतीने झारेकरगल्ली येथील मुला-मुलींचे निरिक्षणगृह व बालगृह येथील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख रणजित परदेशी, शहरप्रमुख रोहित लोखंडे, आनंदराव शेळके, सुनिल लालबोंद्रे, योगेश गलांडे, मुश्ताफा शेख, सरफराज खान, प्रल्हाद जोशी, युवा सेना प्रमुख महेश लोंढे, दामोदर भालसिंग, काका शेळके, विनोद शिरसाठ, तारिक कुरेशी, ओंकार फुलसौंदर, सुभाष काकडे, महेश तोडमल, पवन कुमटकर, विजय चव्हाण आदि उपस्थित होते. याप्रसंगी रोहित लोखंडे म्हणाले, जनतेच्या विश्वासास पात्र राहुन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काम करत आहेत. जनतेचा सेवक म्हणून काम करतांना सर्व घटकांच्या उन्नत्तीसाठी अहोरात्र काम करत आहेत. रुग्णांना गरजेवेळी मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येत आहे. आज वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्ठान्न भोजन देत सामाजिक दायित्व जपले आहे. यावेळी बाबुशेठ टायरवाले, आनंदराव शेळके, सुनिल लालबोंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.