नगरमधील बसस्थानक परिसरात ‘दम मारो दम’

0
57

नगर – नगर शहरातील बसस्थानकांचे परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनलेले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील स्वस्तिक चौकाजवळील पुणे बस स्थानक परिसरात सायंकाळी व रात्रीच्या वेळी गांजा ओढणार्‍या ३ गर्दुल्यांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरुवारी (दि.९) सायंकाळी माहिती मिळाली की, पुणे बस स्थानकाचे पाठीमागे व परिसरात सायंकाळी व रात्रीचे वेळी काही इसम हे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतात. त्याचा परिसरात रहाणारे तसेच ये – जा करणारे नागरिकांना त्रास होतो. ही माहिती मिळाल्यावर पो.नि. दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला त्या ठिकाणी कारवाई साठी पाठविले. या पथकाला रोहीत बबन बुरकुले (वय ३७, रा. लोंढेनगर, कल्याण रोड), पंकज नामदेव शिंदे (वय ३२, रा. बुरुडगाव रोड, इंम्पेरियल हॉटेलचे पाठीमागे), संकेत सुनिल खापरे (वय २६, रा. विनायकनगर, अहमदनगर) असे पुणे बस स्थानकाचे पाठीमागील बाजुस वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसुन गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांची सिव्हील हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांचे कडुन वैद्यकीय तपासणी केली असता त्यात वर नमुद तिनही इसमांनी गांजाचे सेवन केले असलेबाबत अहवाल दिलेला आहे. नमुद तिनही इसमांचे विरुध्द एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २७ प्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.