नगर – नगर तालुयातील भातोडी गावातून एका अल्पवयीन मुलीला (वय १७ ) अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि. ७) सकाळी ११ ते गुरुवारी (दि.८) पहाटे २ या दरम्यान घडली. मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने तिच्या आईने गुरुवारी दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या गृहिणी असून त्यांची १७ वर्ष वयाची मुलगी बुधवारी (दि. ७) सकाळी ११ वाजेपासून घरातून गायब झालेली आहे. त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मग त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिची काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा.दं. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग हे करीत आहेत.