सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, तर न्याय कोणाला मागायचा?

0
79

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून आ.बाळासाहेब थोरात यांचा सवाल

नगर – राज्य सरकारचा गुन्हेगारावरचा धाक संपलेला आहे, तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहे. त्यामुळे न्याय कोणाला मागायचा असा खोचक सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. याबाबत भाजपचा आमदारच मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो. याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणी करत बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले. नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे तीन लोक झाले असून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले अशी उपरोधीक टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या राष्ट ्रवादी काँग्रेसच्या निर्णयानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधार्‍यावर निशाणा साधला आहे. कुणी पक्ष बदलला तर असं सांगत नाही, की स्वत…च्या हितासाठी पक्ष बदलला हा माझा राजकीय हेतू होता. ते सगळे जनतेचेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दूधखुळी नाही. एखाद्या पारावरच्या इसमाला सांगितलं खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट ्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल तो खरा न्याय.

काँग्रेस शिर्डीच्या जागेसाठी आग्रही

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा अहमदनगर दक्षिण मतदार संघासाठी नव्हे तर शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहोत. आमची चर्चा सुरु आहे. ते म्हणतात आमच्याकडे उमेदवार आहे आम्ही म्हणतो आमच्यकडे उमेदवार आहे. मात्र शेवटी जो निर्णय होईल; त्या पद्धतीने आघाडीचे नेते आणि पदाधिकारी काम करतील; असे मत काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्ये केले.

भाजप जिंकण्यासाठी काहीही करू शकते

भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. ईव्हीएममध्ये घोटाळा देखील करू शकतात. यावर आपला विश्वास बसत नव्हता. मात्र चंदिगड येथे झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये ईव्हीएमबाबत छेडछाड झाली. सुप्रीम कोर्टाने देखील यावर ताशेरे ओढले आहेत. यावरून निश्चितच ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो. यावर आपला विश्वास बसला असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला कोणी सोडून गेला म्हणून काहीही थांबत नाही

काँग्रेस पक्षाला अनेकजण सोडून जात आहेत, त्या पार्शभूमीवर प्रश्न विचारला असता थोरात यांनी सांगितले की कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, हे मी मान्य करतो. १९८० साली सुद्धा अशीच अवस्था होती. काँग्रेस कुठे आहे हे विचारलं जातं होतं. इंदिरा गांधी यांच्या सोबत फिरण्यासाठी माणसे नव्हती. १९९९ ला आणि २०१९ ला काँग्रेसचे किती उमेदवार निवडून येतील हे विचारले जातं होते. मात्र मोठ्या झाडाच्या फ़ांद्या शेतकरी छाटतो आणि त्याला नव्याने पालवी फुटते हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे कोणी गेला म्हणून काहीही थांबत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी आ. लहू कानडे, जयंत वाघ, किरण काळे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, अल्तमश जरीवाला आदी उपस्थित होते.